Ads (728x90)

मतदार जनजागृतीबाबतची महारॅली संपन्न  

 मतदार जागृती व त्या अनुषंगाने मतदार नोंदणी मोठया प्रमाणात व्हावी, म्हणून  बृहन्मुंबई महानगरपालिका आणि घाटकोपर मधील रामजी आसर विद्यालय संचलित लक्ष्मीचंद गोलवाला वाणिज्य व अर्थमहाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज (सोमवार दिनांक २६.०९.२०१६ रोजी) रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.           मुंबई महानगरपालिकेच्या येत्या फेब्रुवारी २०१७ मधील निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार, जिल्हाधिकारी (शहर) व जिल्हाधिकारी (उपनगर) यांनी तयार केलेली मतदार यादी वापरायची असून, विधानसभेच्या ०१.०१.२०१७ रोजीच्या मतदार यादीत नाव असणाऱयांनाच, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान करता येईल. छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम १५.०९.२०१६ पासून १४.१०.२०१६ पर्यंत चालू राहणार असून, या कालावधीत  ०१.०१.२०१७ रोजी, १८ वर्षे पूर्ण करणाऱया युवक-युवतींच्या नावाची मतदार म्हणून नोंद करण्यात येणार आहे. मतदार नोंदणी मोठया प्रमाणात व्हावी, यासाठी शहर व उपनगरातील १२३  महाविद्यालये तसेच शहर व उपनगर जिल्हाधिकाऱयांकडून जवळपास ८५० केंद्रे आणि महानगरपालिकेची २४ विभाग कार्यालये मतदान नोंदणीसाठी सज्ज झालेली आहेत. त्यावेळी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग  यांसह तन्ना ज्युनिअर कॉलेज व एमडी भाटीया हायस्कूल यांच्याही शिक्षकानी व विद्यार्थ्यांनी, संस्थेच्या पदाधिकाऱयांनी, सर्व प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. रॅलीचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष धीरुभाई मेहता व एन विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सुधांशु  द्विवेदी यांच्या हस्ते सकाळी करण्यात आले. त्यावेळी  निवडणूक विभागाचे निरीक्षक सत्यवान मेस्त्री, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.ए.डी.वंजारी, संस्थेचे सचिव देवेंद्रभाई शहा, एन विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.भोसले उपस्थित होते.या रॅलीमध्ये जवळपास ३००० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांचे शिस्तबध्द संचलन, जनजागृती व मतदार नोंदणीबाबतच्या प्रभावी घोषणा यामुळे सर्व परिसर नागरिकांचे आकर्षण ठरले होते. ही रॅली लक्ष्मीबाई गोलवाला महाविद्यालयाकडून राजावाडी हॉस्पिटलमार्गे गुरुकुल कॉलेजकडून घाटकोपर पूर्व विभागात काढण्यात आली

Post a Comment

Blogger